करमाळा येथील डॉ. बिनवडे यांना दिलासा; गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती
सदर प्रकरणी डॉक्टर राम बिनवडे यांचे तर्फे अॕड निखिल पाटील, अॕड प्रमोद जाधव तर A. I. C. L. कंपनीतर्फे अॕड असीम बांगी यांनी काम पाहिले
करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
मेडिकल बोर्डच्या अहवाला शिवाय डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही असा निर्वाळा माननीय अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला आहे.

यात हकीगत अशी की, करमाळा येथील डॉक्टर राम विठ्ठल बिनवडे यांचे विरोधात करमाळा येथील न्यायालयात भाऊसाहेब शहाजी करगळ राहणार रावगाव तालुका करमाळा यांनी भारतीय न्याय संहिता कलम 105 व 106(1) प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती सदर फिर्यादीमध्ये त्यांनी त्यांची पत्नी शितल करगळ हिचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे व हायगयीने झाला असल्याचे नमूद करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती सदर प्रकरणी करमाळा येथील माननीय न्यायालयाने डॉक्टर राम बिनवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश करमाळा पोलीस स्टेशन यांना दिलेले होते.
सदर प्रकरणी करमाळा पोलीस स्टेशन येथे डॉक्टर राम बिनवडे यांच्या विरोधात F. I. R. दाखल करण्यात आलेला होता व तपासास सुरुवात झालेली होती तर नंतर डॉक्टर बिनवडे यांनी अॕड निखिल पाटील व अॕड प्रमोद जाधव यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणे कामी व माननीय करमाळा न्यायालयाचा आदेश रद्द करणे कामी अर्ज दाखल केले होते.
अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री एस .एल .चव्हाण साहेब यांचे समोर झाली सदर अर्जाचे सुनावणी वेळी अॕड निखिल पाटील यांनी सदरील डॉक्टरांचा कोणताही निष्काळजीपणा नसून जिल्हा मेडिकल बोर्ड व उपजिल्हा मेडिकल बोर्ड येथे त्यांची तज्ञ डॉक्टरांमार्फत चौकशी चालू आहे व अद्याप चौकशी अहवाल आलेला नाही सदरचा अहवाल येई पावेतो त्यांचे विरोधात खाजगी फिर्याद किंवा F. I. R. दाखल करता येणार नाही. त्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने जेकब मॅथ्यूज विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब या न्यायनिर्णयामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला दिला सदर न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या निष्काळजीपणा व हलगर्जीपणाच्या केसेसच्या बाबतीत त्यांची मेडिकल बोर्ड पुढे सुनावणी होणे आवश्यक असून तेथील तज्ञ डॉक्टरांनी तसा निष्काळजीपणाचा अहवाल देणे गरजेचे आहे.
सदर अहवाला नंतरच डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शक तत्व असल्याचे निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून डॉक्टर राम बिनवडे यांना माननीय सत्र न्यायालय बार्शी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला तसेच माननीय करमाळा न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या रिविजनअर्जाची सुनावणी माननीय श्री मांडे साहेब यांच्यासमोर झाली.
सदर अर्जाच्या युक्तिवादावेळी अॕड निखिल पाटील यांनी वरील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा सादर करून त्यातील मार्गदर्शक तत्त्वाच्या विरोधात सदरचा माननीय करमाळा न्यायालयाचा आदेश असून तो रद्दबातल होण्यास पात्र आहे.
त्यामुळे सदरील आदेशास स्थगिती देण्यात यावी अशी विनंती केली सदरची विनंती ग्राह्य धरून व वरील सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या आधारे माननीय सत्र न्यायाधीश श्री मांडे साहेब यांनी करमाळा न्यायालयाच्या डॉक्टर बिनवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेशास स्थगिती दिली.
सदर प्रकरणी डॉक्टर राम बिनवडे यांचे तर्फे अॕड निखिल पाटील, अॕड प्रमोद जाधव तर A. I. C. L. कंपनीतर्फे अॕड असीम बांगी यांनी काम पाहिले




