करमाळा : अपहरण व बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीस जामीन मंजूर
करमाळा, दि. 11 (करमाळा-LIVE)-
देवळाली येथील अपहरण व बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.
याबाबत हकीकत अशी की, 6 मे 2023 मध्ये देवळाली येथील संशयित आरोपीस करमाळा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. आयपीसी कलम 363,376 कलम प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर प्रकरणी आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद बार्शी जिल्हा सत्र न्यायालय यांच्या समोर केला असता माननीय न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस 50000 हजार रुपये आरोपीचा 2 आॕगस्ट 2023 ला जामीन मंजूर केला आहे.
संशयीत आरोपीतर्फे अॕड निखील पाटील व अॕड अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.