डिगा मामांच्या जयंतीला करमाळ्यात भव्य कृषी प्रदर्शन; ‘आठवणीतील मामा’ हे दालन असणार खास आकर्षण- दिग्विजय बागल यांची सोशल मिडीयावरून माहिती

करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)–
माजी राज्य मंत्री, माजी आमदार, लोकनेते स्व.दिगंबरराव (डिगा मामा) बागल यांची 13 मार्च ला 68 वी जयंती असून या जयंतीला करमाळ्यात भव्य कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार असून या प्रदर्शनात ‘आठवणीतील मामा’ हे दालन असणार आहे अशी माहिती श्री मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे.
मामा तालुक्यातील जनतेचे नेते होते आणि त्यांच्या कार्यामुळे ते लोकनेते झाले. करमाळा तालुक्याला स्व. डिगामामांच्या रूपाने मंत्रीपदाची संधी मिळाली. वास्तविक पाहता तालुक्याचे एक धडाडीचे नेते म्हणून मामांनी संपूर्ण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनावर राज्य केले. विरोधकांनाही मामांनी आपल्या वागण्यातून व आपुलकीने आपलेसे केले होते. विरोधकांच्या योग्य व विधायक कामांना त्यांनी न्याय दिला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जनसेवाच केली.

