आंतरराष्ट्रीय मानवधिकार न्याय सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची निवड
करमाळा, दि. 28 (करमाळा-LIVE)-
आंतरराष्ट्रीय मानवधिकार न्याय संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष निरजसिंह यांनी त्यांची निवड पत्राद्वारे केली आहे. दिनेश मडके हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असून कुणबी मराठा समाज सेवा संघ तालुकाध्यक्ष डिजिटल मीडिया पत्रकार संघ करमाळा तालुका अध्यक्ष जीवनज्योत सामाजिक संस्था तसेच विविध सामाजिक चळवळीत हे कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातही गेल्या सतरा वर्षांपासून कार्यरत असून साप्ताहिक पवनपुत्रच्या माध्यमातून सुरुवात करून दैनिक लोकमत, एकमत, तरुण भारत, पुण्यनगरी, जनसत्य या विविध दैनिकांमध्ये त्यांनी काम केले असून पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची काम केले आहे.
करमाळा तालुक्यात मराठा सोयरीक संघाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा सोयरीक संघाचे करमाळा तालुकाध्यक्ष म्हणून ते काम करीत आहेत. विविध सामाजिक चळवळीत ते सक्रियपणे सहभाग असल्याने त्यांना समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीचा चांगला पाठिंबा मिळत आहे. दिनेश मडके यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार सामाजिक न्याय संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जनसेवेची मिळालेली संधी पदाच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे मडके यांनी सांगितले.