सोलापूरातील प्रा.शहाजी ठोंबरे यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशन च्यावतीने सन्मान


करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)-
सोलापूर येथील श्री चौंडेश्वरी प्रशालेचे सहशिक्षक व इंग्रजी भाषा विषयाचे राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक प्रा. शहाजी ठोंबरे सर यांना नुकतेच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली याबद्दल इंग्लिश टिचर असोसिएशनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
“अ स्टडी ऑफ जेंडर रोल विथ रेफरन्स टू मंजु कपूर्स सिलेक्टेड नॉव्हेल्स ” या विषयावर त्यांनी राजस्थान येथील विद्यापीठांतर्गत संशोधन केले. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सोलापूर जिल्हा इंग्लीश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड व मार्गदर्शक प्रा. गुरुनाथ मुचंडे यांनी प्रा. शहाजी ठोंबरे यांचा सपत्नीक सत्कार केला.
यावेळी इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके, सचिव प्रा. गोपाळराव तकिक, सहसचिव प्रा. मारूती जाधव, प्रसिद्धी प्रमुख प्रा. सुखदेव गिलबीले, प्रा.शंकर दिरगुळे, दक्षिण सोलापूर चे तालुका अध्यक्ष प्रा.श्रीमंतराजे भोसले, प्रा.सुरेश नेल्लूरे, प्रा.भाऊराव पाटील, प्रा.विजय बाळगी, प्रा.सिध्दाराम बिराजदार, प्रा.सुरेश पारशेट्टी, प्रा.प्रशांत गुजा, उत्तर सोलापूरचे प्रा. शिंदे सर, प्रा. जमशेट्टी सरप्रा. प्रा.पाटील आदी शिक्षक बांधव उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा.डॉ. ठोंबरे म्हणाले की, हा सन्मान माझ्यासाठी नेहमीच विशेष राहील. इंग्रजी विषयात पीएचडी पदवी प्राप्त करणे आव्हानात्मक असले तरी कठीण नाही. यापुढे इंग्रजी विषयात संशोधन करू इच्छीणाऱ्या शिक्षक बांधवांसाठी मार्गदर्शन करणार असून इंग्लिश टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून विद्यार्थी व इंग्रजी भाषा शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.




