करमाळ्यातील गजराज ड्रायक्निनर्सचे मालक रावसाहेब सावरे यांच्या प्रामाणिकपणाची सेवा अविरत सुरू ; शेलगावच्या (क) सरपंचांच्या पैशांबरोबर आजपर्यंत लाखोंचा ऐवज केला परत


करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-
गजराज ड्रायक्निनर्सचे मालक रावसाहेब सावरे यांच्या प्रामाणिकपणाची सेवा अविरत आजही सुरू असून शेलगावच्या (क) सरपंचांचे पैसे केले परत आहे.
शेलगाव (क) चे सरपंच आत्माराम गणपत वीर यांनी गजराज ड्रायक्निनर्स येथे ड्रायक्लिन करण्यासाठी टाकलेल्या कपड्यांमध्ये चुकून 15 हजार रुपये गेले होते. हे 15 हजार रुपये त्यांना फोन करून प्रमाणिकपणे परत केल्याबद्दल श्री सावरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे. श्री सावरे यांनी आत्तापर्यंत त्यांच्या ड्रायक्लिनच्या दुकानांमध्ये ज्या ग्राहकांनी कपडे ड्रायक्लीन साठी पाठवली होती त्यांच्या कपड्यांच्या खिशामध्ये चुकून आलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल इ. प्रामाणिकपणे परत केलेले आहेत.
रावसाहेब सावरे यांनी आतापर्यंत परत केलेले दागिने आणि रोख रक्कम-
1) यश कल्याणी संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांचे अडीच तोळ्याचे लॉकेट आणि दीड तोळ्याची अंगठी
2) प्रदीप बलदोटा यांचे दीड तोळ्याचे लॉकेट
3) कोठारी (मेन रोड) यांची एक तोळ्याची अंगठी
4) वांगडे एसटी वाहक यांच्या मुलीच्या कानातल्या सोन्याच्या रिंगा
5) अॕड हिरडे वकील यांच्या पत्नीचे सोन्याचे कानातिल रिंगा
6) अॕड हिरडे वकील यांचे ड्रायव्हर त्यांच्या पत्नीचे दोन तोळ्याचे गंठण
7) जगताप सर (राजुरी) यांचा एप्पल मोबाइल
8) मनु गांधी (मेन रोड) यांच्या बाळाचे चांदीचे वाळे व मनगट्या
9) संतोष जाधव यांचे रोख रक्कम 4600 रुपये
10) भांडवलकर यांचे रोख रक्कम 4300 रूपये
11) अमोल पवार यांचा 25 हजारांचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल
12) चत्रभुज नारायण घाडगे (अर्जुन नगर) यांची रोख रक्कम 8382 रूपये
13) डॉक्टर श्रीराम परदेशी यांचे रोख रक्कम व महत्त्वाचे डॉक्युमेंट
14) बालरोग तज्ञ डॉ करंजकर यांचे रोख रक्कम 16000 रूपये
15) आर जे पाटील (करमाळा कॉन्ट्रॅक्टर) यांची रोख रक्कम 1100 रूपये
16) रणसिंग साहेब यांची रोख रक्कम 1000 रूपये
17) आत्माराम गणपत वीर शेलगावचे (क) सरपंच यांचे रोख रक्कम 15000 रूपये
या सर्व ग्राहकांनी ड्रायक्लिनला टाकलेल्या कपड्यांच्या खिशा मध्ये आज पर्यंत मिळालेले रोख रक्कम, सोने, चांदी, मोबाईल, महत्त्वाचे डॉक्युमेंट हे त्यांना संपर्क करून परत करण्यात आले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर
