करमाळा : मानव संरक्षणासाठी मानवधिकार संघटनेचे कार्य मोलाचे- संतोषकाका कुलकर्णी
करमाळा, दि. 7 (करमाळा-LIVE)-
मानव जीवनामध्ये जनसेवा हिच खरी इश्वरसेवा असून मानव अधिकार न्याय हक्काच्या संरक्षणासाठी मानवधिकार संघटनेचे कार्य मोलाचे असून सोलापूर जिल्हाध्यक्षपदी दिनेश मडके यांची निवड होणे हाच करमाळा तालुक्याचा बहुमान असल्याचे मत अखिल ब्राम्हण मध्यवर्ती शाखा करमाळा अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनेश मडके यांची मानव अधिकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात व्यक्त केले. दिनेश मडके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना संतोष कुलकर्णी म्हणाले की, सध्याचे युगामध्ये माणूस माणसापासून दूर चालला आहे स्वतःचै हक्क अधिकार कर्तव्य याची जाणीव नसल्यामुळे आपले स्वातंत्र्य हरवून बसला आहे अशा परिस्थितीमध्ये निकोप समाज निर्मितीसाठी मानवी हक्क संरक्षण काळाची गरज असून सक्षम नागरिकांसाठी उज्वल भवितव्यासाठी मानव अधिकार संघटनेच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन संतोष काका कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमास नरेंद्रसिह ठाकूर, सुहास काळे पाटील, शाम सिंधी सिध्देश्वर दास, शुभम कुलकर्णी उपस्थित होते.