जेऊर परिसरात चिकनगुनियाची एँट्री ; नागरिकांनी काळजी घ्यावी
जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)-
जेऊर परिसरात चिकनगुनियाची एँट्री झालेली असून परिसरातील नागरीक हैराण झालेले आहेत.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून ऐन सणासुदीच्या काळात गोचिड ताप, व्हायरल ताप बरोबरच चिकनगुनियाची साथ आल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत, लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्यावेत असे आवाहन डॉक्टरांनी केलेले आहे.
चिकनगुनियाची लक्षणे-
ताप, तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकनगुनियाची प्रमुख लक्षणे आहेत, तसेच रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणे. अचानक ताप येणे, त्याच बरोबर सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, पुरळ, सांध्यांना सूज येणे, आर्थ्राटीस, उलटी आणि मळमळ
ही लक्षणे आहेत.
काळजी घ्यावी-
लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाणे, भरपूर पाणी पिणे, डासांचा नायनाट करणे, जेथे डास उत्पत्ती होते ते नष्ट करणे.