जेऊरच्या भारत हायस्कूलला ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहीर ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलाच्या भारत हायस्कूल ज्युनिअर काॕलेज ला यावर्षीचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्री यांच्या उपस्थितीत हायस्कूलचे प्राचार्य आबासाहेब सरोदे, उपप्राचार्य नागेश कांबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे तसेच शाळेतील शिक्षकवृदांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जेऊरची भारत हायस्कूलची स्थापना १९५२ रोजी झालेली असून हायस्कूलला आज ७३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडलेले आहेत. हायस्कूलने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, सरपंच पृथ्वीराज पाटील, सचिव अर्जूनराव सरक यांच्यासह संचालक मंडळ, पालकांनी अभिनंदन केले आहे.