जेऊर येथे खटके कुटुंबीयांनी केले गौरींसह महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचे आणि महानमातांचे पुजन

जेऊर, दि. १ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष प्रियांका खटके यांच्या घरी महानमाता यांच्या प्रतिमेचे पूजन व पुस्तकांची आरास केली आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यामाई होळकर, शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख माता रमाई यांच्या प्रतितेचे पूजन करून गौरी पूजन करण्यात आले.
गौरी पूजन निमित्त महापुरुषांच्या पुस्तकांचा देखावा करण्यात आला असून पुस्तकां मध्ये सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, जिजाऊंचे जिवन चारित्र, तुकाराम महाराजांची गाधा, चार्वाक, भारताचे संविधान, संभाजी महाराजांचे बुधभूषण ग्रंथ, अहिल्याबाई होळकरांचे जिवन चरित्र, संतविचारांचे पुस्तक, शिव चरित्र, संत गाडगेबाबांच्या विचारांची पुस्तके, शाहिद भगतसिंग या पुस्तकांनी लक्ष वेधून घेतले आहे.
गौरी पुजनानिमित्त महानमातांचे पूजन व महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांची आरास करण्याची प्रेरणा जिजाऊ ब्रिगेड मुळे व मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडमुळे कळाले गेल्या पंचवीस वर्षांपासून याच पद्धतीने गौरीपूजन केले जात आहे.