जेऊर येथील नवभारत इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चिखलठाण, दि. ३ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील नवभारत इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यावेळी कार्यक्रमात गुणवंतांचा सन्मान करण्यात आला तर यावेळी सृजन या सांस्कृतीक कार्यक्रमाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
नवभारत इंग्लश स्कूलमध्ये स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच पृथ्वीराज पाटील व डॉ सुभाष सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश भाऊ करे-पाटील होते. यावेळी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आयोजित “सृजन २०२५” या सांस्कृतीक कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे अप्रतीम असे सादरीकरण करून प्रेक्षकांंची मने जिंकली.
या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अक्षय चौधरी (जलसंपदा विभाग), अमित लबडे (पोलीस उपनिरीक्षक), किर्ती साळुंके (महसूल सहाय्यक) या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपाली चिंचकर यांनी केले तर आभार प्रदिप चिंचकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला विक्रीकर उपायुक्त नागेश जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, केंद्र प्रमुख वंदना पांडव, सरपंच पांडुरंग लबडे, गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष शंकर पोळ, दादासाहेब लबडे, संतोष गुटाळ, रोहीत लबडे, नागनाथ केकान यांच्यासह पालक व या परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.