हिंदूस्थान फिड्स आणि जेऊर येथील परेशकुमार दोशी किराणा मर्चंट च्यावतीने सातशे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
![IMG-20240125-WA0024.jpg](https://karmalalive.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240125-WA0024.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231101-WA0019.jpg)
जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-
बारामती येथील हिंदूस्थान फिड्स आणि जेऊर येथील परेशकुमार प्रविणकुमार दोशी किराणा मर्चंत च्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले आहे.
करमाळा तालुक्यातील दहिगावं, वांगी-2,3,4, शेलगावं, शेळके वस्ती, जेऊरवाडी येथील जवळजवळ सातशे विद्यार्थ्यांना तब्बल तीन हजार वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. बारामती येथील हिंदूस्थान फिड्स आणि जेऊर येथील व्यापारी परेशकुमार दोशी यांचे परेशकुमार दोशी किराणा मर्चंट च्यावतीने CSR फंड अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बारामती फिड्स कंपनीचे टेक्निकल आॕपरेटर डॉ परमेश्वर चव्हाण, विक्री आॕफिसर महेश टेके, व्यापारी सम्मेद दोशी तसेच सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ व्यापारी परेशकुमार दोशी यांनी आभार मानले.
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240113-WA0044.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/10/IMG-20211101-WA0005-3-1024x320-1.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230708-WA0028.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240122-WA0012.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240101-WA0022.jpg)