जेऊर येथील कुलकर्णी कुटुंबीयांचा ‘पर्यावरण संरक्षण आणि नारी शक्ती चा संदेश देणारा देखावा’
जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील प्रेमनाथ कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पर्यावरण संरक्षण आणि नारी शक्तीचा संदेश देणारा देखावा गौरी-गणपती समोर केला आहे.
या सजावटी मुळे जेऊर परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. जर वर्षी प्रमाणे यावर्षीही श्री कुलकर्णी यांनी आकर्षक देखावा सादर केला आहे. पर्यावरण संरक्षण आणि नारी शक्तीचा देखावा बनविण्यासाठी त्यांना तब्बल दहा दिवस मेहनत घ्यावी लागली असून यातून झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, नारी शक्ती चा संदेश देण्यात आला आहे.