06/06/2025

राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी वंदना गरड यांची तर व्हाईस चेअरमनपदी स्वाती साळुंके यांची निवड

0
IMG_20221223_193109.jpg

करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-
राजमाता रत्नप्रभा देवी मोहिते-पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी वंदना विनोद गरड यांची तर व्हाईस चेअरमनपदी स्वाती सुधीर साळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वंदना गरड यांची दुसऱ्यांदा निवड झालेली असून आज करमाळा येथे सहायक निबंधक यांच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक दीपक तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक महावीर साळुंके, सचिव संतोष नुस्ते, ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड तसेच संचालिका शालिनी नुस्ते, शालिनी कोठावळे, रेश्मा कन्हेरे, सारिका गायकवाड, अनिता वाघमोडे, बानुबी जहागीरदार आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page