Jeur: मानव हेळकर आणि अजित निमगिरे यांचे यश युवकांसाठी प्रेरणादायी; माजी आमदार नारायण पाटील
जेऊर, दि. 11 (करमाळा-LIVE)-
मानव हेळकर आणि अजित निमगिरे यांचे यश युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केले.
जेऊर येथे आयोजीत सक्तार समारंभात ते श्री पाटील बोलत होते. मानव हेळकर याने एन.डि.ए (NDA) या परिक्षेत उल्लेखनीय यश मिळवले तर अजित निमगिरे याने राज्यसेवा परीक्षेत यश मिळवल्याने आता त्याची राज्य उत्पादन शुल्क विभागात नेमणूक झाल्यामुळे या दोघांचे सत्कार जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.
जेऊर येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जूनराव सरक, संत तुकाराम व मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच चरित्र अभिनेते प्रा. डाॅ. संजय चौधरी, जेऊरचे माजी सरपंच भास्कर कांडेकर, सरपंच भारत साळवे, ग्रामपंचायत सदस्य संदिप कोठारी, मुबारकभाई फकीर, विनोद गरड, नागेश झांजुर्णे, राज्य मल्लखांब असोसिएशनचे सदस्य तथा राज्यस्तरीय कोच पांडुरंग वाघमारे, स्वीय सहाय्यक सूर्यकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेने मिळवून दिलेले मुलभुत अधिकार व महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणासाठी या देशात रुजवलेली पाळेमुळे यामुळेच आता ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत आहे. जिद्द, चिकाटी याच्या जोरावर अवघड व आव्हानात्मक परिक्षेत यश मिळवत आहे. हे यश पुढील सर्वच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल व ग्रामीण भागातील व सहाजिकच करमाळा तालुक्यातील विद्यार्थी राज्य व देशाच्या सर्व विभागात महत्वाच्या व उच्च पदावर कार्यरत राहतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले तर आभार प्रा. पोपटराव वाघमोडे यांनी मानले.