08/06/2025

जेऊर ग्रामपंचायत अपडेट : दोन्हीही गटांच्या आज महत्वपूर्ण बैठका

0
IMG_20221108_082501-1.jpg

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
जेऊर ग्रामपंचायत संदर्भात पाटील गट आणि शिंदे गटांच्या आज महत्वपूर्ण बैठका होणार आहेत.

करमाळा तालुक्यात नेहमीच जेऊर ग्रामपंचायत चर्चेची ठरलेली आहे, जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात आजपर्यंत ग्रामपंचायत बिनविरोध कधीच झालेली नाही. यावेळीही ही शक्यता कमीच आहे.

आज दोन्हीही गटांच्या महत्वपूर्ण बैठका होत असून प्रभाग आणि आरक्षण नुसार उमेदवार चाचपणी, सरपंचपदासाठी ओबीसी राखीव असल्यामुळे सरपंचपदासाठी उमेदवार चाचपणी, निवडणूक कुठल्या मुद्यावर लढायच्या, या निवडणुकीत निष्ठावंत तसेच युवक कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार का या संदर्भात कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page