08/06/2025

जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर-

0
IMG_20221108_082501-1.jpg

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE) – करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतची पंचवार्षिक मुदत डिसेंबर 2022 ला संपली असून सध्या जेऊर ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्ती आहे.

दरम्यान निवडणूक पुढील काही महिन्यात लागण्याची शक्यता आहे 2023 निवडणूकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. तसेच आरक्षण ही जाहीर झालेले आहे. ही निवडणूक 5 प्रभागांमध्ये होणार असून एकूण 15 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झालेले आहे. दरम्यान जेऊर ग्रामपंचायत साठी जनतेतून सरपंच निवड होणार असून सरपंचपदासाठी ओबीसी साठी आरक्षण जाहीर झालेले आहे.

जेऊर ग्रामपंचायत प्रभाग निहाय आरक्षित जागा-
प्रभाग क्र. १- (एकूण ३ जागा)-
अनुसुचीत महिला (एसस्सी SC महिला)- १ जागा
नागरिकांचा मागस प्रवर्ग (ओबीसी)- १ जागा
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा

प्रभाग क्र. २ (एकूण ३ जागा)-
अनुसुचीत जाती (एसस्सी SC)- १ जागा
नागरिकांचा मागस प्रवर्ग (ओबीसी)- १ जागा
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा

प्रभाग क्र ३-(एकूण ३ जागा)-
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा
सर्वसाधारण महिला (ओपन महिला)- २ जागा

प्रभाग क्र ४- (एकूण ३ जागा)
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा
सर्वसाधारण महिला (ओपन महिला)- २ जागा

प्रभाग क्र ५- (एकूण ३ जागा)-
नागरिकांचा मागस प्रवर्ग महिला (ओबीसी महिला)- १ जागा
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा
सर्वसाधारण महिला (ओपन महिला)- १ जागा

जेऊर ग्रामपंचायत ची मुदत डिसेंबर 2022 मध्ये संपली असून येत्या काही महिन्यांत ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.

एकूण जागा १५ जागांसाठी, पुरूष- ७ जागा तर महिला-८ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page