17/12/2024

16 वर्षांची दीप महोत्सव परंपरा आजही कायम ; जेऊर येथे नूतन हँडबॉल असोसिएशनच्या वतीने दिवाळी पाडवा सण उत्साहात साजरा

0
IMG-20231115-WA0033.jpg

जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिपावली पाडवा साजरा करण्यात आला.

जेऊर आणि परिसरातील सर्व आजी-माजी खेळाडू या वेळी उपस्थित होते. हा सण सर्व खेळाडू साजरा करत असतात 2004 पासून हँडबॉल मैदानावर खेळाडू सराव करत आहेत त्याच प्रमाणे दिवाळी सण सुद्धा मैदानावर साजरा करतात. यावेळी सर्व खेळाडूंना सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मैदानाचे पूजन राष्ट्रीय खेळाडू आणि मुंबई पोलीस बाळासाहेब जोगदंड यांचे हस्ते करण्यात आले तसेच या वेळी अध्यक्ष संतोष नुस्ते, सचिव विनोद गरड, उपाध्यक्ष नौशाद जहागीरदार, सहसचिव दत्तात्रय वाघमोडे, संचालक विनोद काळे, हर्षवर्धन वाघमोडे तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव वाघमोडे, सनी ताटे, संजय कांबळे, निलेश सातव, विश्वजित सरक, रेहान तांबोळी, सागर जाधव, रोहन मुटेकर, सागर जाधव, करण हिंगमीरे, सनी जाधव, गौरव वाघमोडे, निखिल गायकवाड, प्रणव भोसले, शुभम डोमबाळे, संकेत सरडे, अकिब पठाण, विवान गरड, अजित सरक तसेच सर्व आजी-माजी खेळाडू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page