06/06/2025

करमाळ्यात यशकल्याणी सेवाभवन येथे कारगील ‘विजय दिवस’ उत्साहात साजरा करण्यात येणार

0
IMG-20240721-WA0000.jpg

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील यशकल्याणी सेवाभवन येथे कारगील ‘विजय दिवस’ उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रुर शिंदे आणि यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी दिली आहे.

भारतीय सैन्याने पराक्रम गाजवत कारगील युध्दात मिळालेला अभूतपूर्व विजय सर्व भारतीयांच्या अस्मितेला जागवणारा व अभिमानास्पद असून आपल्या शूर सैनिकांप्रती आदर व्यक्त करुन बलिदान दिलेल्या वीर हुतात्म्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो, मागील वर्षी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांचे सहकार्यातून हा विजयदिन साजरा केला गेला.

२५ वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजयाचा आनंद आणि वीरगती मिळालेल्या शुरांचे स्मरण करण्यासाठी कारगील दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी विजयाचे हे २५ वे रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून देशभर साजरे होत आहे. हेच औचित्य साधत आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटना, करमाळा व यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै रोजी कारगील ‘विजय दिवस’ समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या समारंभासाठी वीरमाता वीरपिता, वीरभगिनी, वीरपत्नी व समस्त देशप्रेमी करमाळकर यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आजी- माजी सैनिक संघटना करमाळा व यश कल्याणी परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page