केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक गावच्या विकासासाठी बिनविरोध करा- युवा उद्योजक स्वप्निल राऊत


केत्तूर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक गावच्या विकासासाठी बिनविरोध करा असा मत युवा उद्योजक स्वप्निल राऊत यांनी व्यक्त केले आहे.
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेली असून करमाळा तालुक्यातील केत्तूर गाव हे गाव विकासा पासून कोसो दूर आहे. गावाला जोडणारे पक्के रस्ते नसुन गेले दहा वर्षांपासून मी शिक्षण व उद्योग धंद्यामुळे बाहेर गावी फिरत असतो. बाहेरील गावाचां मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. परंतु केत्तूर हे गाव विकास कामांपासून वंचित राहिले आहे याला कारणीभूत येथील नेतृत्व करणारे माणसे आहेत. असे असले तरी येणाऱ्या निवडणूक मध्ये जास्तीत जास्त उच्च शिक्षित महिलांना संधी देऊ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी. या साठी गावातील जेष्ठ, युवक, महिला प्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यावा.
यात सर्व समाजातील लोकांना संधी देण्यात यावी. निवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्र शासनाकडून गावच्या विकास कामांसाठी 25 लाख रुपये मिळतात. तशा वेगवेगळ्या योजना शासनाच्या आहेत. या विषयी गावातील काही तरुण सहकार्यांनीं पुढाकार घेतला असून मतदारांमध्ये जागृती झाली पाहिजे. तरी याचा सर्व ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी गांभीर्याने विचार करून निवडणूक बिनविरोध करावी असे स्वप्निल राऊत यांनी सांगितले.


- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर