कुंभेजच्या जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे सामाजिक योगदान कौतुकास्पद – प्रा. गणेश करे-पाटील

गणेशोत्सवानिमित्त आयोजित शिबिरात १०१ जणांचे रक्तदान
करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
रक्तदान शिबिराचे उदघाटन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.करे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रा. करे-पाटील बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरुण पिढी विधायक कार्य करीत असून विविध सामाजिक उपक्रमामध्ये काम करणाऱ्या संस्था यानिमित्ताने विचारांची देवाण घेवाण करीत आहेत. कुंभेजच्या तरुणांनी असेच उपक्रम सातत्याने सुरु ठेवावेत अशी मार्गदर्शक सुचना त्यांनी यावेळी केली.
कुंभेज येथील जय महाराष्ट्र गणेश तरुण मित्र मंडळातर्फे ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमाचे २५ वे वर्ष असल्याने आयोजीत शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले.यावर्षी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत असे मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब साळुंके म्हणाले.
यावेळी प्रा.गणेश करे-पाटील यांचा पुस्तक व वृक्ष रोप भेट देऊन मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब साळुंके ,नामदेव मुटके , रणजित कादगे, पैगंबर पठाण यांनी सत्कार केला.
यावेळी मेजर, विभीषण कन्हेरे, अरविंद साळुंखे, रामभाऊ माने, निखिल काळे, नामदेव मुटके, उमेश पवळ, रावसाहेब सातव, रमेश काळे, महावीर पवार, ग्रामपंचायतचे सदस्य रणजीत कादगे, पैगंबर पठाण, श्रीकांत काळे, महावीर पवार, गणेश काळे, अण्णासाहेब कादगे, संतोष चांदणे, सतीश कन्हेरे, प्रदीप पवळ, प्रदीप शिंदे, पाटील, अरविंद कन्हेरे, सोमनाथ नलावडे, सोमनाथ पवार, गौरव घोरपडे, शिवराज सातव, यश घोरपडे, उपस्थित होते.
जय महाराष्ट्र तरुण गणेश मंडळाच्या वतीने पुढीलप्रमाणे उपक्रमाचे आयोजन
* वृक्षरोपण, आरती साठी येणाऱ्या पाहुण्यांना वृक्ष रोप भेट.
* शाळेतील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सायंकाळी आठ ते दहापर्यंत मोबाईल बंदी
* एकल वापर प्लास्टिक टाळण्यासाठी जनजागृती
* सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पूजेतील साहित्य निर्माल्य संकलन व त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती
* थोर संत महात्म्यांचे विचारांचे फलक दर्शनी भागात लावून प्रबोधन.
* अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज देवस्थानचे विश्वस्त भारतराव शिंदे पाटील यांच्या सौजन्याने मंडळाचे वतीने महिला हळदी कुंकू समारंभ प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या
150 मूर्तीचे आदरपूर्वक वितरण
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामभाऊ माने यांनी केले. सूत्रसंचालन उमेश पवळ यांनी केले तर मेजर बिभिषण कन्हेरे यांनी आभार मानले.