17/12/2024

कुंभेज येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न

0
IMG-20240112-WA0056.jpg

चिखलठाण, दि. 13 (करमाळा-LIVE)-
कुंभेज येथील शिवस्फूर्ती समुहाच्या वतीने आयोजीत शिबीरात १०९ रक्तदात्यांनी रक्तदान करून राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.

शिवस्फूर्ती समूहाच्या वतीने येथील ज्योतिर्लिंग मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात कृषी पुरस्कार विजेत्या शेतकरी हर्षाली नाईकनवरे व आदर्श शिक्षिका रेखा साळुंखे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान शिवस्फूर्ती समूहाचे अनिल कादगे यांच्यावतीने करण्यात आला.

करमाळा येथील कमलाई ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान सुविधा उपलब्ध करण्यात आली होती यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात १०९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शुभारंभ प्रसंगी बोलताना प्रा. कल्याणराव साळुंखे यांनी भरकटत चाललेल्या तरूण पिढीला जिजाऊचे विचार आणि संस्कारच भविष्यात वाचवू शकतात. त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या विचाराचा जागर सर्वत्र होणे गरजेचे आहे शिवस्फूर्ती समूहाच्या वतीने दरवर्षी सुरू असलेल्या हे कार्य इतर तरुणांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

यावेळी प्रणिती गुटाळ हीने राजमाता जिजाऊंची वेषभुषा साकारली होती. या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष अक्षय तळेकर, कुंभेजचे उपसरपंच संजय तोरमल, दिग्दर्शक मंगेश बदर, वांगी येथील उदय देशमुख, माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष अक्रुर शिंदे, गणेश शिंदे, अमोल मुटके, नानासाहेब साळुंके, पत्रकार गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, बिभीषण कन्हेरे, युवराज भोसले, कानिफनाथ गुटाळ, नितीन भोसले, दत्ता रेगुडे, बाळासाहेब तोरमल, विनोद कादगे, वैभव कादगे, ऋषीकेश भोसले, कुमार कादगे, आण्णासाहेब भोसले, ऋषिकेश नलवडे, श्रीराम शिंदे, गणेश सुर्वे, संदेश पोळ, महावीर भोसले, प्रशांत पवार, सुहास पोळ, महादेव पोळ, रमेश सुरवसे, अतुल भोसले यांच्यासह या परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page