स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात गुरूवारी तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन



करमाळा, दि. 26 (करमाळा-LIVE)-
करमाळा येथील यशकल्याणी सेवाभावी संस्था, शिक्षण विभाग पंचायत समिती व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषण कौशल्य विकसित व्हावे व्यावहारिक जीवनात त्यांना आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याचे धाडस निर्माण व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा पुढीलप्रमाणे गटांत होईल-
पहिला गट- इयत्ता पाचवी ते सहावी
दुसरा गट- इयत्ता सातवी ते आठवी
तिसरा गट- इयत्ता नववी ते दहावी
या स्पर्धेच्या दिवशीच बक्षीस वितरण दुपारी 2.00 वाजता यशकल्याणी सेवाभवन येथे करण्यात येणार आहे. हा समारंभ प्रा. गणेश करे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या कार्यक्रमास सोलापूरच्या माध्य. शिक्षणाधिकारी डॉ. तृप्ती अंधारे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षण अधिकारी राजकुमार पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. बाबुराव हिरडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकार बांधवांचीही या समारंभास उपस्थिती असणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
यशकल्याणी सेवाभावी संस्थेसह, पंचायत समिती शिक्षण विभाग व इंग्लिश टीचर्स असोसिएशन द्वारे विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी करमाळा तालुक्यात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून यापुढेही अशा शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असे इंग्लीश टीचर्स असोसिएशनचे प्रमुख सल्लागार, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. करे-पाटील यांनी सांगितले.


