स्व सुभाष आण्णा सावंत यांच्या संस्काराच्या शिदोरीवर सावंत कुटुंबाची समाजकारणात अन् राजकारणात यशस्वी वाटचाल सुरू- हभप कबीर अत्तार महाराज

करमाळा, दि. १७ (करमाळा-LIVE)-
जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित घटकांच्या जीवनात आनंदाचा झरा निर्माण करून त्यांचे जीवन समृद्ध करून सावंत कुटुंबांला संस्कारांची शिदोरी देणारे स्व सुभाष आण्णा सावंत यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत हभप कबीर अत्तार महाराज यांनी स्व सुभाष आण्णा सावंत यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या किर्तनात व्यक्त केले.
कामगार नेते सुभाष आण्णा सावंत यांचे कार्य हे दिशादर्शक होते. त्यांच्या कार्याचा वारसा ॲड. राहुल सावंत व सावंत कुटुंब सक्षम पुढे नेण्याचे काम त्यांची पिढी करत आहे. आदर्श पिता म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांचे नाव नक्कीच अजरामर झाले आहे. कारण त्यांनी केलेले कार्य फक्त सावंत कुटुंबासाठी नाहीतर सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, हमाल, तोलार यांच्या कल्याण्यासाठी अविरतपणे संघर्ष करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या रोजी रोटीसाठी बापमाणूस म्हणून केलेले काम नक्कीच भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
स्व सुभाष आण्णा सावंत यांच्या संस्काराच्या शिदोरीवर सावंत कुंटुंबाची समाजकारणात, राजकारणात यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी असे आवाहन हभप कबीर अत्तार महाराज यांनी केले आहे.
स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली आणि करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने करमाळ्यात सावंत गल्ली येथील मारुती मंदिरासमोर कीर्तन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घघाटन तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गजानन गुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रोहन पाटील, डॉ. बाबूराव लावंड, डॉ. अनुप खोसे, ॲड नवनाथ राखुंडे, सरपंच धनंजय शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या शिबिरात १७४ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला पाण्याचा जार भेट स्वरूपात देण्यात आला. श्री कमलाभवानी ब्लड बँकेने रक्त संकलन केले. हभप कबीर महाराज यांच्या कीर्तनानंतर शहर व तालुक्यातील मान्यवरांनी स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला आमदार नारायण आबा पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, स.पो.नि. रोहित शिंदे, डॉ. वसंतराव पुंडे, प्रा. रामदास झोळ, लालासाहेब जगताप, शेखर गाडे, बापूराव देशमुख, राजेंद्रसिंह राजेभोसले, सूर्यकांत पाटील, प्रभाकर शिंदे, किसन आण्णा शिंदे, विठ्ठल शिंदे, पाराजी शिंदे, सावळा झिंजाडे, एकनाथ झिंजाडे, गोविंद किरवे, विलास मुळे, संदिप शेळके, गोवर्धन करगळ, केशव केकाण, नानासाहेब जाधव, बाळासाहेब अडसूळ, निवृत्ती सुरवसे, चंद्रकांत काळे, विजय थोरात, पांडुरंग भांडवलकर, गणेश अंधारे, उमेश बागल, आनंद बागल, जयद्रथ शिंदे, नितीन घोलप, महादेव फंड, राजू आव्हाड, प्रकाश झिंजाडे, देविदास वाघ, सरपंच मोरे भाऊसाहेब, बिभीषण आवटे, नागेश ढेरे, डॉ. दिपक केवारे, डॉ. विशाल शेटे, ॲड. डॉ. बाबूराव हिरडे, ॲड अलिम पठाण, ॲड. अजित विघ्ने, अॕड. एम. डी. कांबळे, अॕड. इंगळे, अॕड. नानासाहेब शिंदे, अॕड. प्रमोद जाधव, अॕड बलवंत राऊत, शिवाजी बंडगर, उपाध्यक्ष संचालक दत्तात्रय देशमुख, राजाभाऊ कदम, हजारे, रवींद्र फुके, उमेश सरडे, आबा अंबारे, रामेश्वर तळेकर, कार्यकारी संचालक अरुण बागनवर, रवींद्र फुके, उमेश सरडे, आबा अंबारे, रामेश्वर तळेकर, कार्यकारी संचालक अरुण बागनवर, बाळासाहेब गायकवाड, शिवशंकर जगदाळे, महादेव गायकवाड, जनार्दन नलवडे, शहाजी शिंगटे, किरण पाटील, ॲड सुनिल रोकडे, पप्पू शिंदे, ॲड प्रशांत बागल, ॲड सुहास मोरे, ॲड विशाल घोलप, जयंत दळवी, सचिन जव्हेरी, दिनेश मडके, विशाल परदेशी, अशोक मुरूमकर, अलिम शेख, भोजराज सुरवसे, दत्तात्रय अडसूळ, विलास बरडे, प्रताप बरडे, गौतम ढाणे, तात्या पाटील, भाऊसाहेब काळे, बबन नरसाळे, भागवत वाघमोडे, सुरेश भोगल, विलास जाधव, आण्णा पाटील, चित्तरंजन पाटील, विलास नलवडे, नंदू घाडगे, मोहन पडवळे, शशिकांत केकाण, मानसिंग खंडागळे, दौलत वाघमोडे, प्रविण मुरूमकर, माधव नलवडे, नामदेव शेगडे, रावसाहेब शिंदे, अध्यक्ष विजय दोशी, मिलिंद दोशी, परेश दोशी, मनोज पितळे, विकी मंडलेचा, उत्कर्ष गांधी, प्रदिप लुणिया, विलास दळवी, नानासाहेब मोरे, राजेंद्र घाडगे, मनोज गोडसे, मनोज राखुंडे यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी नगरसेवक संजय सावंत, सुनिल बापू सावंत, डॉ. संकेत सावंत, गणेश सावंत, गौरव सावंत, वालचंद रोडगे, विठ्ठल रासकर, सागर सामसे, शिवराज गाढवे, ज्ञानेश्वर गोसावी, सतीश खंडागळे, शरद वाडेकर, गोविंद सुरवसे, बापू उबाळे, वैभव सावंत, फारुख जमादार, विठ्ठल गायकवाड, संदिप पडवळे, संदिप दुधाळ, नामदेव शिंदे, गजानन गावडे, दादा सुरवसे, पप्पू रंदवे, सागर वीर, शुभम कोंगे आदींनी परिश्रम घेतले.