17/12/2024

श्रीरामनवमीला श्रीरामनामाच्या गजरात करमाळा शहरात निघणार भव्य-दिव्य शोभायात्रा

0
images-47.jpeg

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त गुरुवार दि. 30 मार्च 2023 रोजी करमाळा शहरात श्रीरामनामाच्या गजरात भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

करमाळा शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी शोभायात्रा उत्सवात साजरी करण्याचे आयोजन श्रीरामनवमी उत्सव समिती वतीने करण्यात आले आहे. सुभाष चौकामध्ये सकाळी 11 वाजता श्रीराम मूर्तींचे पूजन करून दुपारी 12 वाजता महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे.तत्पूर्वी सकाळी 10.30 वाजता शहरातील विविध महिला मंडळाच्या वतीने श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता महादेव मंदिर किल्ला वेस येथून शोभा यात्रेचा प्रारंभ होईल. यंदा आकर्षक अशा सुशोभित रथामध्ये हा रामदरबार विराजित असणार आहे.तसेच या शोभायात्रेमध्ये विविध पारंपरिक वाद्ये, बँड पथक आणि शहर व तालुक्यातील विविध भजनी मंडळ, टाळकरी मंडळ असणार आहेत. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात येणार आहे. रामभक्तीमय वातावरणात निघणाऱ्या या शोभायात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी समितीच्या वतीने सुरू आहे. श्रीरामनवमी निमित्त होणाऱ्या या शानदार सोहळ्यामध्ये तालुक्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन श्रीरामनवमी शोभायात्रा समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page