‘नशा मुक्त भारत अभियान’ : सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसिडर म्हणून महेश वैद्य यांची निवड
करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-
आपल्या पाल्याची संगत कुणाबरोबर आहे. या गोष्टीकडे पालकांनी लक्ष द्यावे तसेच पालक व पाल्य यांच्यामध्ये संवाद असल्यास मुलं व्यसनाच्या आहारी जात नाहीत असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.
त्यांची समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत नशा मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्ह्यासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, करमाळा यांच्यावतीने करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किसन कांबळे, राष्ट्रीय समाज पार्टी जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, भाजपा तालुका सरचिटणीस श्याम सिंधी, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते उन्मेष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजची युवा पिढी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून तंबाखू, गुटखा, मावा, धूम्रपान, दारू याबरोबर ड्रग्स च्या विळख्यात सापडली आहेत. त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी पालकांचा सुसंवाद त्यांचे संस्कार या गोष्टींना प्राधान्य देणे आवश्यक आहे व्यसनमुक्त युवा पिढी हीच राष्ट्राचे आधारस्तंभ आहे. यासाठी सर्व देश वासियांनी कडून जनजागरण होणे आवश्यक आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये यासाठी आपण गावोगावी कुटुंब कुटुंबापर्यंत जाऊन प्रबोधन करणार आहोत असे ही मत त्यांनी व्यक्त केले.