गट-तट बाजूला ठेवून मांगी पाणी प्रश्न सोडवण्याच्या लढ्यात नागरिकांनी सामील व्हावे- गणेश चिवटे
करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
राजकीय जोडे बाजूला ठेऊन मांगी पाणी प्रश्न सोडवण्याच्या लढ्यात नागरिकांनी सामील व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे.
मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात विलीन करण्यासाठी करमाळा भाजप संपर्क कार्यालयात आज बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, मांगी तलावावर आज 22 गावातील शेती अवलंबून आहे तसेच 13 गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. मांगी तलावात फक्त कर्जत तालुक्यातील पाणी येते. कर्जत तालुक्यातील नद्या, ओढ्यावर अनेक बंधारे, मातीनाले झाल्याने मांगी तलावात पावसाचे पाणी येत नाही, परिणामी वर्षानुवर्षे तलाव कोरडा राहतो.यामुळे याचा प्रतिकुल परिणाम तलावावर अवलंबून असणाऱ्या शेती व पाणी पुरवठा योजनावर होतो. यामुळे मांगी तलाव कुकडी लाभलाक्षेत्रात समाविष्ट होणे गरजेचे आहे.हि लोकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी आहे व मूलभूत गरज आहे.
आज राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे.माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपण हा प्रश्न सोडवून घेणार आहोत. याबद्दल खासदारांनी सकारात्मक अनुकूलता दर्शवली आहे.मांगी लाभक्षेत्रातील गावामध्ये मी स्वतः गेल्या सात -आठ दिवसापासून बैठका घेत आहे. या लढ्यात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत त्यामुळे मांगी लाभक्षेत्रातील इतर लोकांनीही राजकीय जोडे बाजूला ठेऊन या पाणी प्रश्नाच्या लढ्यात सामील व्हावे असे चिवटे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, बाळासाहेब कुंभार, रामभाऊ ढाणे, संजय घोरपडे, बिटगावचे सरपंच डॉ.अभिजीत मुरुमकर, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, श्याम सिंधी, बाळासाहेब होसिंग, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, दासाबापू बरडे, अमोल पवार, नितीन झिंजाडे, विष्णू रंदवे, मच्छिंद्र हाके, सोमनाथ घाडगे, आजिनाथ सुरवसे, विनोद महानवर, जयंत काळे पाटील, हर्षद गाडे, किरण शिंदे, आबा वीर, कैलास पवार, समाधान काळे, संदीप काळे, लक्ष्मण काळे, किरण बागल, प्रकाश ननवरे, विशाल घाडगे, मनोज मुसळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.