लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील- उद्योगपती मनोज चिवटे
करमाळा, दि. 7 (करमाळा-LIVE)-
करमाळा व शहर व तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून लिंगायत समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मेळावा घेणार असल्याचे उद्योगपती मनोज चिवटे यांनी व्यक्त केले.
ओंकार ॲग्रो एजन्सी मालक व उद्योगपती मनोज चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, खोलेश्वर महादेव मंदिराचे गुरव नागेश, काळे अर्बन बँकेचे माजी संचालक फारुख जमादार, शिवसेना रंभापूरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, जेऊर शाखाप्रमुख संजय जगताप, प्राध्यापक कुंभार सर, अशोक बर्डे, दिनेश दळवी, राशी सीड चे मार्केटिंग मॅनेजर नागेश शेंडगे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला. कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान देण्यासाठी ओंकार एजन्सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात पासून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान म्हणून मनोज चिवटे त्यांनी केली.