सोशल मिडिया आणि इंटरनेट मुळे युवा पिढी भरकटली; गटविकास अधिकरी मनोज राऊत
करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)-
युवकांची क्रयशक्ती वाढवायला हवी परंतु त्याला रोखण्याचे काम मोबाईलद्वारे होताना दिसत आहे. ग्रामीण असो की शहरी मोबाईलचा डेटा इंस्टाग्राम, फेसबुक, व्हट्सअप याद्वारे तासन् तास आजची पिढी गुरफटलेली दिसून येत आहे असे मत करमाळा येथील गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा तसेच हॅपी हेल्थ हॅपी माईंड अकादमी मुंबई यांच्यावतीने समंतभद्र हॉल येथे फिटनेस कॅम्प च्या सांगता समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार विवेक येवले, ब्राह्मण संघाचे गंगाधर काका कुलकर्णी, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डॉ. वसंत पुंडे, एकलव्यचे संस्थापक रामकृष्ण माने आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री राऊत म्हणाले की, आज मन आणि मेंदू ला आपण काबू करू शकत नसल्यामुळे आजची युवा पिढी गुलाम होताना दिसत आहे. अशीच वाटचाल चालू राहिल्यास इतर देशांच्या तुलनेत आपण पाठीमागे राहूच परंतु अनेक प्रकारच्या व्याधीने आपण त्रस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मोबाईल असो किंवा इंटरनेट असो योग्य कामासाठीच उपयोग करणे आवश्यक आहे. त्याच्या आहारी गेल्यास विनाश निश्चित आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी गंगाधर कुलकर्णी, विवेक येवले, रामकृष्ण माने, महेश वैद्य, किसन कांबळे, संजयराजे घोरपडे, भावना गांधी, संतोष काका कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले.
डॉ तुषार गायकवाड, विनोद कुमार गांधी, विकास गांधी, श्रेणिकशेठ बिनाकिया, महेश दोशी, अशपाक सय्यद, निलेश गंधे, योगिनी देवी, मुन्ना शेठ हसीजा, श्रद्धा गांधी, बाळासाहेब पंडित अविनाश जोशी आदी उपस्थित होते. हॅपी माईंड हॅप्पी हेल्थ चे प्रशिक्षक महेश वैद्य यांनी आरोय विषयी प्रबोधन केले योग्य व्यायाम करणे आवश्यक आहे ही काळाची गरज आहे. शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी केम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या यात्रा बंदोबस्त मध्ये होमगार्ड यांच्यावतीने चौख बंदोबस्त बजावल्याबद्दल प्रातनिधीक स्वरूपात होमगार्ड तालुका समोपदेशक सचिन जव्हेरी व महिला होमगार्ड माया गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संतोषकाका कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे स्वागत सचिव बाळासाहेब होसिंग यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केले.