करमाळ्यात मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा : सचिन काळे यांची माहिती
करमाळा, दि. 31 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांची लवकरच करमाळ्यामध्ये विविध विषयासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष सचिन काळे यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने करमाळा तालुक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती व भव्य मिरवणूक बऱ्याच वर्षापासून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून होत होती ती जयंती पुन्हा मोठ्या उत्साहाने चालू करणार असल्याचे श्री काळे यांनी सांगितले. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये वाढ होऊ शकते या संघटना शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या संघटना आहेत. या परिवर्तनवादी संघटना जिवंत राहणे व त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्यच आहे त्यामुळे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही एक विचारधारा आहे त्या विचारधारेपासून कधीही लांब जाऊ शकत नाही पदावर असो किंवा पदावर नसतो कार्य हे निरंतर चालूच आहे राहील.
करमाळा तालुक्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने करमाळा तालुक्यामध्ये बरेच शिवधर्म पद्धतीने विवाह पार पडले तसेच अंत्यविधीही पार पडले शिवचरित्र हे डोक्यावर मिरवण्याचा विषय नसून ते शिवचरित्र डोक्यात घालण्याचा विषय आहे असे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ने सांगितले व स्वतःचा मेंदू कोणाचाही गुलाम ठेवू नका असे विचार सांगितले हे विचाराचे परिवर्तन करमाळा तालुक्यामध्ये चिरंतर चालू राहावे यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड उर्जित अवस्थेत राहणे गरजेचे आहे खऱ्या अर्थाने ही संघटना वाढवण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये डॉ सुजित शिंदे व बाळासाहेब सुर्वे यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली तसेच प्राध्यापक संजय चौधरी, प्रा नागेश माने, गणेश कुकडे, विनायक ननवरे, संदिप, नितीन खटके, संजय गुटाळ, नितीन तकिक, दलित नेते सुहास ओहोळ, जीवन होगले, सतीश वीर, सूर्यकांत पाटील, भीमराव लोंढे, भैय्या घाडगे,
अजित कवडे, रवी घाडगे, सोमनाथ शिंदे, गणेश जाधव, डॉ नानासाहेब सरडे, हरिभाऊ हिरडे, श्री शितोळे अशा अनेक दिग्गजांनी वेळ देऊन करून संघटना वाढवली आहे व नवीन विचार करमाळा तालुक्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला आहे.