चिखलठाण येथील शिबीरात ५६९ जणांची मोफत नेत्र तपासणी, तर ४७ जणांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलठाण ग्रामपंचायतीच्या वतीने काल भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये नागरिकांच्या रक्तामधील साखर तपासून मोफत शुगर तपासणी किट देण्यात आले.
आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल व चिखलठाण ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकुण ५६९ जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर यात शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे अशा ४७ नेत्र रुग्णावर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला गेला. तर या शिबिरात ४५७ नागरिकांची रक्तामधील साखर तपासण्यात आली. ज्यांना शुगर आहे असे तपासणी नंतर खात्रीशीर माहिती झाले अशा ३१५ मधुमेह रुग्णांना घरच्या घरी साखर तपासणी करता यावी म्हणून मोफत शुगर तपासणी मशीन (किट) देण्यात आल्या.
या शिबीरास करमाळा तालुक्याचे युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी भेट दिली व रुग्णांची विचारपूस केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आमदार नारायण आबा पाटील यांनी हजारो रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान एक लाख पन्नास हजार रुपये प्रत्येकी मिळवून दिले. शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा करमाळा मतदार संघातील गरजू व गरीब रुग्णांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन सुध्दा पृथ्वीराज पाटील यांनी केले. तर चेअरमन विकासराव गलांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात चिखलठाण ग्रामपंचायतीच्या विकासकामांना उजळणी देऊन राबवलेल्या विविध जनहितांच्या उपक्रमांचा लेखा जोखा मांडला. यावेळी रावसाहेब नेमाणे यांनीही विचार मांडले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच धनश्रीताई गलांडे, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, विद्यमान संचालक हनुमंत सरडे, जेऊर ग्रामपंचायत सदस्य उमेश कांडेकर, हेमंत बारकुंड, डॉक्टर ब्रिजेश बारकुंड, सोगावचे राहुल गोडगे, बाळासाहेब कोकाटे, योगेश सरडे, संतोष सरडे, महादेव सरडे, बबन सरडे, माजी उपसरपंच आबासाहेब मारकड, साहेबराव मारकड, बाबू नेमाने, हनुमंत सरडे, हनुमंत हिरवे, कैलास बोंद्रे, विजय कोकरे, नितीन पाटील, सतीश बनसोडे, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब गव्हाणे, रामेश्वर गलांडे, मनोहर गव्हाणे, मच्छिंद्र कांबळे, चंद्रकांत सुरवसे, मारुती गायकवाड, दत्तात्रय बारकुंड, धनाजी मारकड आदी उपस्थित होते.
सूत्रसंचलन प्रसिद्ध निवेदक विकास दोलतोडे यांनी केले तर आभार विरेंद्रप्रताप गलांडे यांनी मानले.