आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊर येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन- माजी सभापती अतुल भाऊ पाटील

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊर येथे २३ ऑगस्टला शनिवारी महाआरोग्य शिबीराचे आयोजन केल्याची माहिती माजी सभापती अतुल भाऊ पाटील यांनी दिली आहे.
याबाबत अधिक सविस्तर बोलताना माजी सभापती पाटील यांनी सांगितले की, जेऊर येथे २३ रोजी शनिवारी हे आरोग्यदायी शिबीर होणार असून ते संपूर्ण पणे मोफत आहे. शिवाय रुग्णांना औषधे सुध्दा मोफत दिली जातील. या शिबीरामध्ये डॉ अविनाश राऊत (अस्थिरोग तज्ञ), डॉ अमोल डुकरे (बालरोग तज्ञ), डॉ अंकुश पवार (भुलतज्ञ), डॉ संतोष अडगळे व डॉ विशाल बंडगर (स्री रोग तज्ञ), डॉ अनिल खटके (नेत्र शल्यचिकित्सक) आदि मान्यवर डॉक्टर उपस्थित राहून आरोग्य तपासणी करणार आहेत.
सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत तपासणी चालू राहील. तरी रुग्णानी या शिबीरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सभापती अतुल भाऊ पाटील यांनी केले. तर दिनांक २६ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) येथील आनंद ऋषी नेत्र रुग्णालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी जेऊर येथे रुग्ण तपासणी करण्यात येईल. सदर सहभागी रुग्णांना मोफत अहिल्यानगर येथे नेण्यात येऊन मोफत शस्त्रक्रिया केली जाईल व मोफत औषधे देऊन घरी पोहोच केले जाईल.
तरी याचा लाभ नेत्र रुग्णांनी घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य संदिप कोठारी यांनी केले. तर आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी साठी ९७६३४०२५८० या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करावी असे आवाहन वाढदिवस संयोजन समिती सदस्य किरण पाटील व जेऊर ग्रामपंचायत सदस्य उमेश कांडेकर यांनी केले आहे.