प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! एसटी ने प्रवास करायचा असेल तर अंथरून, पांघरूण, तंबू घेऊनच बाहेर पडा, कुठे मुक्काम करावा लागेल सांगता येणार नाही
करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-
प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! एसटी ने प्रवास करायचा असेल तर अंथरून, पांघरुन, तंबू घेऊनच बाहेर पडा, कुठे मुक्काम करावा लागेल सांगता येणार नाही अशा प्रकारचे मेसेज आता सोशल मिडीयावर येत असून याला कारणीभूत करमाळा आगार आहे.
एसटी महामंडळाच्या करमाळा आगाराच्या बस ला उतरती कळा लागली असून गेल्या तीन महिन्यांपासून कमीतकमी दररोज एक बस बंद पडत असल्यामुळे प्रवासी हैराण झालेले आहेत.
करमाळा आगारात सध्यातरी 65 गाड्या उपलब्ध आहेत. परंतु आगाराला 85 गाड्यांची गरज आहे. उपलब्ध असलेल्या 65 गाड्यांत दररोज दोन-तीन गाड्या नेहमी बंद पडत आहेत.
करमाळा-LIVE ला सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार पुढीलप्रमाणे गाड्या खराब झाल्यामुळे बंद पडल्या आहेत.
14 डिसेंबर- करमाळा ते पुणे- यवत येथे बंद पडली (फोटो उपलब्ध नाही)
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”