03/12/2025

करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’

0
IMG-20251119-WA0023.jpg

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-
करमाळा नगरपालिकेची निवडणूक रंगतदार मोडवर आलेली असून भाजप, शिवसेना, करमाळा शहर आघाडी अशी तिरंगी लढत जवळजवळ निश्चित झालेली आहे.

दरम्यान नगरपालिकेच्या प्रभाग क्र.५ मध्ये ‘काटे की टक्कर’ पहायला मिळणार आहे. प्रभाग क्र. ५ मधून जगताप विरूद्ध जगताप असा सामना होणार असून यात कोण बाजी मारणार हे निकालानंतर समजणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप निवडणूक लढवित असून त्यांच्या समोर माजी नगरसेवक राहुल जगताप निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे प्रभाग क्र.५ चे अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये करमाळा नगरपालिकेस महाराष्ट्र मध्ये नावलौकिक मिळवून दिला, महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत म्हणून वैभवराजे जगताप यांना पुरस्कार मिळाला. कोरोना काळामध्ये करमाळा नगरपालिकेच्या तात्कालीन सी ओ तसेच नगरपालिका प्रशासन व स्वतः राजेंनी रुग्णांची सेवा तत्परतेने केल्याची दखल नागरिकांनी घेतली शहरातील रस्ते सुशोभीकरण केले तसेच पाणीपुरवठा विभाग,आरोग्य विभाग, ग्रंथालय व इतर सगळ्या विभागांवरती मजबूत प्रशासकीय पकड असलेले तसेच नगरपालिका कंत्राटातुन अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला, नगराध्यक्ष म्हणून वैभव राजे यांना त्यांचे पिताश्री करमाळा तालुक्याच्या समाजकारण व राजकारणातील एकमेव, ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या ‘भाऊंचे’ मार्गदर्शन सदैव पाठीशी राहिले आहे.

तर करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. ५ मधून भाजपकडून राहुल नामदेवरावजी जगताप हे आहेत. सन २००६ पासून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली आहे. कर्मवीर आण्णासाहेब जगताप, देशभक्त नामदेवरावजी जगताप साहेबांची व स्वर्गीय लोकनेते दिगंबर मामा बागल यांच्या विचारांची शिदोरी पाठीशी घेऊन घुमरे सर, भाजप प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल, युवानेते दिग्विजय बागल, चिंतामणी दादा जगताप, कनिष्ठ बंधू प्रतापराव जगताप व सर्व जाती व धर्मातील ज्येष्ठ, युवक, माता माऊलींच्या मार्गदर्शनाने शाहूनगर, बारा बंगला येथे कधीच नव्हते ते रसत्यांच्या डांबरीकरणाची कामे व नाना नानी पार्क उभे केले तसेच रिंग रोड येथील ‘झोपडपट्टी नियमित’ करून रेणुका नगर येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये टँकर पाणीपुरवठा, दिवाबत्तीची व्यवस्था करणे यासह अनेक विकास कामे करून नागरिकांनी दिलेल्या मतांचा सन्मान राहुल भैया यांनी केला. राहुल भैया हे उच्चशिक्षित असून अरब देशांमध्ये फळांचा एक्सपोर्ट चा व्यवसाय करीत आहेत त्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला, एकही गुन्हा दाखल नसलेले स्वच्छ प्रतिमेचे, युवा आकर्षक, पारदर्शी व्यक्तिमत्व,नि-भ्रष्ट, म्हणून भैय्यां कडे पाहिले जाते.

करमाळा नगरपालिका प्रशासनातील दोन्ही अनुभवी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी यंदाच्या नगरपालिका प्रभाग क्रमांक पाचच्या निवडणूक प्रचारात संपूर्ण शहरात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page