17/12/2024

उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी एकनिष्ठ पणे उभा रहाणे हीच स्व बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली- शंभूराजे फरतडे

0
IMG-20231117-WA0049.jpg

करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या पाठीशी एकनिष्ठ पणे उभा रहाणे हीच खरी स्व बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन युवा सेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी व्यक्त केले.

युवासेना संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले या वेळेस फरतडे बोलत होते. यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे शहरप्रमुख प्रवीण कटारीया यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अधिक बोलतना फरतडे म्हणले की, शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या भाषणात उद्धव साहेब व आदित्य साहेब यांच्या पाठिशी एकनिष्ठ रहा आदेश दिला मात्र काही बाप चोरणाऱ्या टोळींनी ठाकरे परिवाराच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली आहे मात्र निष्ठावंत शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबत रहातील हिच खरी स्व बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले. या वेळेस शिवसेना मा तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे, शहरप्रमुख प्रवीण कटारीया, उपशहरप्रमुख आदित्य जाधव यांनी देखील विचार व्यक्त केले. युवासेना शाखा प्रमुख ओकांर कोठारे, मयुर तावरे, विनोद पाटील, भाऊ मस्तुद बालाजी वाडेकर, संतोष वायकर, कालिदास कदम, शाखा प्रमुख मोतीराम फरतडे, नवनाथ फरतडे, कृष्णा बोराडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page