करमाळ्यातील लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा “इंस्पिरेशनल बुक अवार्ड प्रदान

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवार्ड प्रदान करण्यात आला आहे. यावेळी इंग्रजी विषयात साहित्य लेखन करणाऱ्या लेखकांचा यशकल्याणी संस्थेच्याच्या वतीने प्रा.डॉ. गणेश करे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय इंग्रजी भाषा कार्यशाळेमध्ये हा विशेष सन्मान करण्यात आला.
इंग्रजी भाषा कार्यशाळा नुकतीच पार पडली या कार्यशाळेत करिअर व भविष्यातील संधी या विषयावर डॉ. प्रचिती पुंडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

यावेळी समुपदेशक व सुप्रसिद्ध वक्त्या डॉ. सुनिता दोशी, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूरचे माजी उपप्राचार्य प्रा.डॉ. धनाप्पा मेत्री, लेखिका व प्रोलक्स कंपनीच्या डायरेक्टर डॉ. प्रचिती पुंडे, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पूणेचे इंग्रजी भाषा तज्ञ प्रा. श्रीधर नागरगोजे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, इंग्रजी विषय संघटनेचे गुरुनाथ मुचंडे, प्रा. भिष्माचार्य चांदणे उपस्थित होते. पंचायत समिती करमाळा चे इंग्रजी विषय समन्वयक रेवण्णाथ आदलिंग, नवनियुक्त सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे करमाळा तालुका अध्यक्ष कल्याणराव साळुंके, सचिव गोपाळराव तकीक-पाटील, सहसचिव मारूती जाधव, प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलबिले, प्रा.विष्णू शिंदे, प्रा.जयेश पवार तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक बांधव आणि सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य व सर्व तालुका अध्यक्ष व सचिव शिक्षक उपस्थित होते.
तब्बल पंचवीस हून अधिक पुस्तके लिहीणाऱ्या डॉ.प्रचिती पुंडे यांनी आपल्या लेखनात मनाचे आरोग्य या विषयी सविस्तर लेखन केलेले आहे याच कार्याची दखल घेत या वर्षीचा इंस्पीरेशनल बूक अवार्ड 2024, देऊन सन्मान करण्यात आला. यापुढे करमाळा तालुक्यातील इंग्रजी भाषेतून लेखन करणाऱ्या लेखकांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जाणार असल्याचे प्रा.डॉ.करे पाटील यांनी जIहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुखदेव गिलबिले, प्रा.विष्णू शिंदे, प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी केले तर आभार सहसचिव प्रा. मारूती जाधव यांनी मानले.
- वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान
- श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन
- जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक
- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबीर संपन्न
- आवाटी येथे सोमवारी हजरत बु ‘अलीशाह कलंदर रह पानीपत’ यांच्या स्मरणार्थ ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन




