20/10/2025

डिकसळ पुल दुरुस्तीसाठी आमदार आबा पाटील‌ अलर्ट मोडवर ; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची घेतली भेट

0
IMG-20250731-WA0019.jpg

करमाळा, दि. ३१ (करमाळा-LIVE)-
पुणे व सोलापूर जिल्ह्यास जोडणारा उजनी जलाशयावर असलेला ब्रिटिश कालीन पुल पावसामुळे ढासळल्याने करमाळा व इंदापूर या दोन तालुक्यातील नागरिकांचा संपर्क तुटला होता. हा पुल उजनी जलाशयातील सध्या वाढत असलेल्या पाण्यामुळे ढासळला गेला. ही बातमी समजताच आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली.

तेथील नागरिकांच्या दळणवळणाच्या समस्या जाणून घेतल्या व लहान वाहनांसाठी वाहतुकीस परवानगी मिळावी अशी भुमिका नागरिकांनी केलेल्या मागणी नुसार संबंधित विभागाकडे व्यक्त केली. यावर लहान वाहनांसाठी प्रवेश दिला गेलाऋ आता या पुलाची तातडीने दुरुस्ती झाली पाहिजे यासाठी आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन पाठवले तसेच आज प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.

त्यांना या पुलाची सद्यस्थिती व हा पुल किती महत्वाचा आहे हे‌ सविस्तर सांगितले. तसेच या पुलाची तातडीने दुरुस्ती केली जावी अशी मागणी केली. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन लवकरच या जुन्या पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे. आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी दाखवलेल्या कार्यतत्परते बाबत पश्चिम भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page