लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी ; व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन


करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)-
लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असून लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान युवा मतदारांनी नाव नोंदनी करावी हे आवाहन करण्यासाठी काही जणांची निवड आली आहे. यात यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे.



