दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
जेऊर, दि. ३० (करमाळा-LIVE)-
दहिगावं उपसा सिंचन योजनेच्या वीज बिल आकारणी पुर्ववत करण्यात यश आले असून यामध्ये आवर्तन वाढीव काळ चालवण्यासाठी मदत मिळणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.
याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, दहिगावं उपसा जलसिंचन योजना ही पुर्ण क्षमतेने चालू असली तरी संपूर्ण कार्यक्षेत्र ओलीताखाली येत नसल्याने आवर्तन काळात वसुल पाणीपट्टी व आवर्तन काळात खर्च झालेल्या वीजेच्या बील आकारणीचे गणित बिघडत होते.
मार्च २०२५ पर्यंत वीज बिल आकारणी ही प्रति युनिट १ रुपये १६ पैसे इतकी होती. परंतु नंतर मात्र शासनाने व महावितरण कंपनीने वीज बिलात वाढ केली. यानंतर वीज बिल आकारणीत पाच पट वाढ करण्यात आली व प्रति युनिट ५ रुपये ७८ पैसे इतक्या रकमेने वीज बिल आकारले गेले. हा निर्णय उपसा सिंचन योजनेच्या तोट्यचा होता. किंबहुना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत होता. यामुळे आपण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वीज बिल आकारणी दर पुर्ववत करण्यासाठी विनंती केली. तसेच दिनांक १ जूलै २०२५ रोजी एक निवेदन (जाक्र ८४०) दिले. या गोष्टीचा सतत पाठपुरावा केला. नुकताच उपसा जलसिंचन द्वारे वापरल्या जाणाऱ्या वीजेची बिल आकारणी ही प्रति युनिट १ रुपये १६ पैसे इतकाच करण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे आता मध्यंतरी झालेल्या वीज बिलाच्या रकमेत कपात होईल व पुढील रब्बी आवर्तन देताना सुध्दा या निर्णयामुळे फायदा होईल असे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.
तर दहिगाव उपसा सिंचन योजना ही कायमस्वरूपी सौर उर्जेवर चालावी ही मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी सन २०१६ पासुन केली होती. या मागणीसही यश आले असुन उजनीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर मोठा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असुन शासनाकडुन एका पथकाने याबाबत प्रत्यक्ष कार्यस्थळी येऊन पाहणी केली आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तन काळात एका पुर्ण दिवसासाठी तब्बल दोन लाख रुपये वीज बिल येते.
यामुळे आमदार नारायण आबा पाटील यांच्या मागणीनुसार सौरऊर्जा प्रकल्पातून खुप मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले.
