17/12/2024

..तर मग दहिगावं उपसा सिंचन योजनेचे ही आवर्तन सुरू करावे- सतीश नीळ यांची मागणी

0
IMG-20230718-WA0039.jpg

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-
उजनी धरणातील पाणी पातळीने मृत साठ्यात प्रवेश केल्यावर कालव्याद्वारे पाणी सोडता येणार नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीने मागणी नसतानाही कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याच पाश्वभूमीवर दहीगाव उपसा सिंचन योजनेचे ही आवर्तन सुरू करा अशी मागणी मागणी श्री.मकाई साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात श्री नीळ यांनी म्हटले आहे की, सध्या उजनी धरणातील पाणी पातळी ९ टक्के असुन सोलापूर शहरासाठी नदीद्वारे पिण्यासाठी विसर्ग सुरू आहे. काही दिवसातच धरण मृत साठ्यात प्रवेश करेल.परिणामी दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करता येणार नाही. याचीच दखल घेत ज्या पद्धतीने कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तोच नियम दहीगाव उपसा सिंचन योजनेस लागू करुन तात्काळ आवर्तन सुरू करावे.स्व.दिगंबररावजी बागल यांनी अथक प्रयत्न करून मंजूर केलेली पूर्व भागातील शेतकऱ्यांना दहीगाव उपसा सिंचन योजना ही संजीवनी ठरली आहे.या योजनेच्या पाण्यावर उस,केळी,फळबागांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या दारात समृद्धीचे दिवस येत असतानाच उजनी जलाशयातील पाणी पातळी खालावल्याने ही योजना पाण्याअभावी बंद राहण्याची शक्यता आहे.परिणामी लाखो रुपये खर्च करून आणलेली पिके वाया जातील. सध्या उजनी धरणातील पाणी साठा ९ टक्क्यांपर्यत आहे. सद्य स्थितीत दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या जँकवेल मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. प्रशासनाचा जो निर्णय कालव्याद्वारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना लागू होतो तोच निर्णय येथील शेतकऱ्यांना लागू करुन येथील शेतकऱ्याप्रती सहानुभूती पूर्वक विचार करुन दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सोलापूर, प्रांतधिकारी कूर्डवाडी, जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page