05/01/2025

पांडे येथे जगदंबा देवीची यात्रा उत्साहात संपन्न

0
IMG-20231101-WA0047.jpg

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
तालुक्यातील पांडे येथील ग्रामदैवत श्री जगदंबा देवीची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमेला भरणारी ही यात्रा शनिवार दि. २८ रोजी ही यात्रा भरली. यात्रे दिवशी पहाटे पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते श्री जगदंबा देवीचा महाअभिषेक करण्यात आला.

यानंतर बारा गाड्यांचे पुजन, शेरणी, नैवेद्य, नारळ तोरण इत्यादी कार्यक्रम पार पडले. संध्याकाळी पाच वाजता देवी भक्त राजेंद्र कोल्हे व भगवान दुधे यांच्याकडून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम दोन वेळा संपन्न झाला. या वर्षी प्रथमच यात्रेदिवशी चंद्रग्रहण आल्याने चंद्रग्रहण संपल्यानंतर पहाटे तीन वाजता जगदंबा देवीची छबीना मिरवणुक काढण्यात आली.

यात्रेनिमित्त गुलामभाई दोस्ती ब्रास बॅन्ड, साई बॅंजो, जगदंबा हलगी पथक यांसह आराधी मंडळींच्या उपस्थितीत देवीच्या विविध वाहनांसह गावातील प्रमुख चौकातुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली आली. यानंतर सकाळी ११ वाजता देवीचा छबीना मंदिरात पोहोचला. ग्रामस्थांनी पारंपारीक पध्दतीने पोथ खेळणे आदी धार्मिक सोपस्कार उत्साहात पार पाडले.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेमध्ये मिठाईची दुकाने, खेळणी स्टाॅल, लहान मुलांचे पाळणे आदीने मंदिर परिसर गजबजून गेला. या यात्रेला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवाय संध्याकाळी कलगीतुरा तसेच मनोरंजनासाठी चंदन स्वर ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दुसऱ्या दिवशी जंगी कुस्तीचा आखाडा भरवण्यात आला होता. नामवंत मल्लांनी या आखाड्यात हजेरी लावली. यात्रा पार पाडण्यासाठी यात्रा कमेटी तसेच ग्रामस्थांनी परीश्रम घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page