पांगरे येथील बलभीम बालकाश्रमात विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप
जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-
राष्ट्र जागृती बहुउद्देशीय मंडळ जेऊर संचलित बलभीम बालकाश्रम पांगरे येथे संस्थेमार्फत 46 प्रवेशितांना शूज, स्वेटर, खेळाचे साहित्यांचे वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष परेश कुमार दोशी, मकाईचे संचालक सचिन पिसाळ, पांगरे चे उपसरपंच धनंजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व युवा उद्योजक महेश टेकाळे व माजी उपसरपंच विवेक पाटील, संस्था सदस्य सचिन नुस्ते उपस्थित होते.
सोलापूर येथे झालेल्या चाचा नेहरू बाल महोत्सव स्पर्धेत बलभीम बालकाश्रम चे विद्यार्थी वकृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या आदित्य चौगुले व हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम आलेल्या कृष्णा कांबळे तसेच गणित प्रदर्शन मध्ये बलभीम बालकाश्रम चा तृतीय क्रमांक आला. या विद्यार्थ्यांचा वरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. प्रतिभा पवार यांनी आभार मांडले.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”