कविटगावं-पांगरे येथील एम.बी नुस्ते विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
चिखलठाण, दि. 15 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पांगरे येथील मच्छिंद्र नुस्ते विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व जेऊर येथील व्यापारी परेशकुमार दोशी व अध्यक्ष एम. बी नुस्ते यांनी ध्वजारोहण केले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांची भाषणे झाली गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना उपाध्यक्ष श्री दोशी म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या पिढीचे योगदान आजची पिढी विसरत चालली असून अशा स्थितीत फक्त स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी देशप्रेम दाखवण्यापेक्षा देशाविषयी काय आदर व प्रेम प्रत्येकाच्या मनात कायम कायमस्वरूपी निर्माण होणे गरजेचे आहे. तर पत्रकार गजेंद्र पोळ यांनी तालुक्यात गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांसाठी दर्जेदार व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी तालुक्यातील या क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले, यावेळी शिक्षक निमगिरे सर यांनी देशापुढे असलेल्या अनेक समस्याचा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी प्रास्तविक मुख्याध्यापक भोसले सर यांनी केले तर आभार लिमकर सर यांनी मानले.
या कार्यक्रमाला पत्रकार गजेंद्र पोळ, संस्थेचे अध्यक्ष एन. बी. नुस्ते उपाध्यक्ष परेश दोशी, संतोष नुस्ते, पवार मॅडम, लिमगीरे सर, तिवारी सर, तांबोळी सर यांच्यासह सर्व शिक्षक पालक व परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.