17/12/2024

करमाळा पोलिसांची खाकी गरजली; चक्री जुगार अखेर बंद: एका तरुणाने तीन दिवसात गमावले होते पंधरा लाख

0
IMG-20221208-WA0035.jpg

करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील चक्री नावाचा जुगाराचे धंदे करमाळा पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून या पोलिसांच्या कारवाईमुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

ऑनलाइन चक्री जुगाराचा खेळ करमाळा शहरात धुमाकूळ घालत होता 16 अनाधिकृत चक्रीच्या माध्यमातून रोज लाखो रुपयांची लूट होत होती लाखो रुपये हरणाऱ्या अनेक तरुणांनी चक्रीच्या व्यसना पायी घरे दारे गहाण ठेवली आहेत, कुणी घरे विकली आहेत. घरातले कोणी सोनं मोडले आहे, त्यामुळे करमाळा शहरातील स्वास्थ्य खराब झाले असून या जुगारीचा आलेल्या ऑनलाईन चक्रीवर आळा घालण्याची गरज निर्माण झाली होती पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल येऊन सर्व ऑनलाईन चक्री जुगारी बंद केले आहेत. ऑनलाइन चक्री जुगार करमाळ्यात डॉक्टर पवार हॉस्पिटल शेजारील सात-आठ टपऱ्या, देवीचा माळ रोडवरील काही टपऱ्यांमधून तसेच गल्लीबोळातील काही आडबाजूच्या ठिकाणावर राजरोसपणे चालत होत्या, प्रत्येक चाळीस सेकंदाला याचा निकाल येतो समोर एक कॉम्प्युटरचा संगणक असतो व त्याच्यावर ऑनलाइन जुगार घेतला जातो 40 सेकंदात निकाल आल्यानंतर हारजीत कळते एका एका आकड्यावर दहा हजार ते वीस हजारच्या रकमा खेळल्या जात
होत्या, या चक्री जुगारातून उध्वस्त झालेल्या कुटुंबाच्या नवीन नवीन घटना उघडकीला येत आहेत.

शहरात बायपासला प्लॉटिंग पाडलेल्या एका प्लॉट धारकाच्या मुलाने प्लॉट विकून आलेले 15 लाख रुपये केवळ तीनच दिवसात या ऑनलाइन चक्री मध्ये हरल्याची निष्पन्न झाल्यामुळे संबंधित कुटुंबामध्ये व त्या बुक्की चालकांमध्ये हमरी तुमरी झाल्याची चर्चा आहे.

एका नगर माजी नगरसेवकाच्या मुलांनी बचत गटाचे चाळीस हजार रुपये बँकेतून काढून आणले चालता चालता तो ऑनलाइन चक्री मध्ये गेला दहाच मिनिटात चाळीस हजार घालून आला. एका तरुणाला या चक्रीमुळे जवळपास एक कोटी रुपयांचे कर्ज झाले असून त्याने जागा विकायला काढले आहे. ज्या ठिकाणी चक्री चालवण्यासाठी त्याच्याकडे किमान दोन लाख रुपये डिपॉझिट करावे लागता एखाद्या गाळ्याला बाहेर पडदा लावला असेल तर तर चक्री ऑनलाइन जुगार चालू आहे, एका डॉक्टरच्या कंपाउंडर ने डॉक्टर ने बँकेत भरायला दिलेली पाच लाख रुपये एक तासात चक्री मध्ये घालवले चा किस्सा काही दिवसापूर्वी गाजला होता या चक्रीच्या व्यसनामुळे करमाळ्यातील तरुण पिढी बरबाद होत आहे यातूनच गुन्हेगारी दादागिरी व्यसनाधीनता व्याजाची धंदे फोफावत आहेत.

पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी केलेले या धडक कारवाईमुळे करमाळा शहरवासीय व तालुक्यातील नागरिकांना नागरिकांकडून त्यांचे स्वागत होत आहे. आता शंभर टक्के करमाळा तालुक्यातील चक्री जुगार बंद झाल्यामुळे तरुण पिढी या विळख्यातून आता सुटणार आहे मात्र येणाऱ्या काळात पुन्हा या चक्रीने डोके वर काढू नये याची पोलीस प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

करमाळा शहराला चक्री जुगाराची ग्रहण लागले असून यातून तरुण पिढी लुटली जात आहे चक्री ऑनलाइन जुगार बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करून हा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या बिमोड केला आहे माझा मुलाला दोन दिवसांपूर्वी चाळीस हजार रुपयाला या चक्रीत फसवण्यात आले आहे. रोज किमान 20 ते 25 लाखाची जुगार या चकऱ्या माध्यमातून होत होती.
रविंद्र कांबळे, माजी नगरसेवक करमाळा.

करमाळा तालुका व परिसरात बेकायदेशीरपणे चक्री जुगार चालविणाऱ्यांवर धडक मोहीम राबवली जात आहे पद्धतीने बेकायदेशीरपणे चक्री जुगार कोण चालवत असेल तर पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी प्लीज प्रशासनाकडून कडाक कारवाई केली जाईल.
ज्योतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक करमाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page