17/12/2024

करमाळ्यात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

0
IMG-20230604-WA0039.jpg

करमाळा, दि. 4 (करमाळा-LIVE)-
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 जयंतीनिमित्त के. हाईट्स करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाजाच्या वतीने जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, रक्तदान, शरबत व थंड पाण्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

31मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ॲड.सविता शिंदे व प्रा.डाॅ.अंजली श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. तर रक्तदान व सरबत वाटप उद्घाटन दत्ताकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर सर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी रक्तदान शिबिर व सरबत वाटप प्रसंगी आवर्जून भेट दिली. यावेळी करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती भाग्यश्रीताई शिंदे-खटके व पांडे ग्रामपंचायत सरपंच अनिता मोटे, प्रा.भारत माने, संदीप खटके, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष जीवन होगले, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण होगले, माजी सरपंच संदीप मारकड, शुभम बंडगर, धनगर धर्म पिठाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, गंगाधर वाघमोडे, तात्यासाहेब काळे, जीआरडी माझाचे संपादक पत्रकार जयंत दळवी, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिंह ठाकूर, शाम सिंधी, ब्राह्मण संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष कुलकर्णी, लेखक डॉ.समाधान कोळेकर, युवा नेते विशाल कोळेकर, संभाजी ब्रिगेडचे राज झिंजाडे, रासप सोशल मीडिया तालुकाध्यक्ष दशरथ मारकड, प्रा. श्रीकांत दरगुडे, महानगर सर, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव गाडे, बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम, पोपट कदम, रवी विठ्ठल शिंदे, मच्छिंद्र कडू, रासप नेते शंकर सुळ, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, विकास मेरगळ, रघुवीर खटके, आप्पा भोसले, जगन्नाथ सलगर, नितीन लगस, काशिनाथ होगले, दीपक कडू, राज ठोंबरे, विठ्ठल भिसे आदी उपस्थित होते.

प्रतिमा पूजना वेळी अॕड.सविता शिंदे यांनी अहिल्याराणी होळकर यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. रामदास झोळ सर म्हटले की, करमाळा येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष सकल धनगर समाजाच्या वतीने तीन दिवसीय सामाजिक कार्य घेऊन अनावश्यक खर्चाला फाटा देऊन महापुरुषांची जयंती साजरी करणे हेच खरे अभिवादन आहे. खऱ्या अर्थाने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी लोकाउपयुक्त कार्य केले. प्रजाहितदक्ष राज्यकर्ता कसा असावा, हे त्यांनी कार्यातून दाखवून दिले. स्वत:च्या संस्थानाबाहेरही लोकहिताची कामे केली. देशात ठिकठिकाणी रस्ते, देवळं, बारव, विहिरी, तलाव, मुक्या प्राण्यांना पानवटे, नदीघाट, लोकहिताची अनेक कामे, जातीभेद, धर्मशाळेसारख्या असंख्य सोयीसुविधा निर्माण केल्या, त्या आजही तितक्याच भक्कमपणे उभ्या आहेत. अहिल्याबाईंनी निर्माण केलेल्या सोयीसह देशवासियांच्या मनात राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवण्याचे मोलाची कामे त्यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लढाऊ, महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. महिलांच्या सक्षमीकरणाची कामे त्यांनी त्याकाळात केली. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण अधिकार दिले. शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांना प्रोत्साहन दिलं.लुटारूनचा बंदोबस्त केला. लोककला, कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्विकारलं अहिल्याबाई होळकर महान राज्यकर्त्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page