लोकनेते स्व.दिगंबरराव बागल कृषी महोत्सव : पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल पत्रकार दिनेश मडके यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान
करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-
लोकनेते स्व दिगंबरराव मामा बागल यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त कृषी महोत्सवामध्ये संघर्षातुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुठलाही वारसा वरदहस्त नसताना केवळ जिद्द चिकाटी परिश्रम प्रामणिकतेच्या सत्याची कास धरुन पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साप्ताहिक पवनपुत्र चे संपादक डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिनेश उद्धवराव मडके यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन बार्शीचे आमदार माजी मंत्री दिलीपराव सोपल यांच्या हस्ते पत्नी सुवर्णा मडके सपत्नीक सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. मार्गदर्शक विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, निमंत्रक माजी आमदार शामलताई बागल, साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल, स्वागताध्यक्ष मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आदर्श पत्रकार म्हणून सन्मान करण्यात आला.
पत्रकार दिनेश मडके गेल्या 17 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. दैनिक एकमत दैनिक तरुण भारत, दैनिक लोकमत, पुण्यनगरी अशा विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केले आहे. सध्या ते दैनिक तरुण भारत संवाद, दैनिक जनसत्यचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. समाजाच्या हितासाठी आपल्या लेखणीतून सकारात्मक भूमिकेतून पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी प्रामाणिकपणे काम केले असून त्यांच्या या कार्याची दखल स्व . दिगंबरराव बागल प्रतिष्ठानच्या वतीने घेऊन त्यांचा सन्मान केला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार दिनेश मडके यांना मिळाल्यामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.