शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण

चिखलठाण, दि. २० (करमाळा-LIVE)-
कृषी विभागाच्या वतीने शेटफळ येथे महिलांसाठी शिवार फेरी व माती नमुना काढणे व बिज उगवण क्षमता तपासणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
करमाळा तालुका कृषी अधिकारी व जिजामाता महिला शेतकरी गट शेटफळ यांच्या वतीने शेटफळ येथे महिलांसाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी सुप्रिया शेलार यांनी महिलांना शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी माती परीक्षणाचे महत्त्व सांगून प्रेक्षणासाठी मातीचा नमुना काढण्याविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले याशिवाय सध्या गहू व हरभरा पेरणी सुरू असल्याने आपण शेतात फिरायच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी कशी करावी याविषयी महिलांना प्रशिक्षण दिले.
याशिवाय कृषी विभागाच्या योजना विषयी माहिती दिली कृषी यांत्रिकीकरण व फळबाग प्रक्रिया उद्योग ए. आय. महाविस्तार ॲप वापरणे विषयी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, शेतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत असतात आधुनिक शेती संदर्भातील बारकावे महिलांच्या लक्षात आल्यानंतर निश्चितच शेतीमधील उत्पादनामध्ये वाढ होणार आहे यासाठी महिलांनी नवनवीन माहिती आत्मसात करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तनिष्का गटाच्या गटप्रमुख हर्षाली नाईकनवरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका पोळ यांनी केले तर आभार प्रतिभा पोळ यांनी मानले यावेळी लक्ष्मी पोळ, स्मिता पोळ, राणी पोळ,सुमन डिगे, अर्चना पोळ, सुमन पोळ अश्विनी पोळ, आरती पोळ यांच्यासह गटातील सर्व महिला उपस्थित होत्या.




