करमाळा : शिवसैनिकांच्या राजकीय तसेच दिवाणी केसेस मोफत लढवणार- अॕड शिरीष लोणकर



करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
राजकीय वादातून शिवसैनिकांवर झालेल्या केसेस मोफत लढवणार असून शिवसैनिकांचे वैयक्तिक दिवाणी दाव्याच्या वाद मोफत लढवणार असून शिवसेनेकडून शिवसैनिकाकडून कुठलीही घेणार नाही अशी ग्वाही शिवसेनेचे प्रवक्ते अॕड शिरीष लोणकर यांनी दिली.
अॕड लोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मनसे भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहर प्रमुख चंद्रकांत राखुंडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश फंड, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, नगरसेवक राखुंडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालय प्रमुख दीपक पाटणे, शहर प्रमुख संजय शिलवंत, उपशहर प्रमुख नागेश गुरव, तालुका उपप्रमुख सतीश रुपनवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अॕड लोणकर हे भारत सरकार नियुक्त नोटरी प्रदान असलेले विधिग्न असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे कायदेशीर सल्लागार आहेत. करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक असून किल्ला विभागातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात
वकील क्षेत्रात धबधबा असलेले अॕड लोणकर यांचे आज वाढदिवसानिमित्त गावात ठिकठिकाणी स्वागत व सत्कार झाले.
यावेळी बोलताना अॕड लोणकर यांनी उर्वरित राहिलेल्या आयुष्यात सर्वसामान्य जनतेच्या मोफत केसेस लढण्याचे निश्चित केले असून वकिलीच्या माध्यमातून अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र अहोरात्र कार्यालय उघडे राहील असे सांगितले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर म्हणाले की, करमाळ्याच्या वकील क्षेत्रात गेली 30 ते 35 वर्षापासून अॕड लोणकर कार्यरत असून त्यांनी अनेक सहकारी संस्थेची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
विशेषता कोरोना काळात प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांवर केलेल्या खोट्या केसेस रद्द करण्यासाठी त्यांनी हायकोर्टात केलेली लढाई करमाळा शहरवासीच्या लक्षात आहे. सर्वसामान्य जनतेला मोफत आपली वकिली प्रदान करणाऱ्या अॕड लोणकर यांचा आदर्श समाजाला दिशा देणार असल्याचे मत व्यक्त केले.



