करमाळ्यातील किल्ला विभाग येथे श्रीदत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन


करमाळा, दि. 4 (करमाळा-LIVE)-
करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील किल्ला विभागातील श्री दत्तात्रय देवालयात श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
श्री दत्तात्रय देवालयात सालाबादप्रमाणे यंदाही बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.03 श्रीदत्त जन्मोत्सव होणार असून त्या निमित्त मंदिरा मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीदत्त जयंती दिवशी अभिषेक, आरती, प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री दत्तात्रय देवालय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

