11/01/2026

मायेचा वटवृक्ष आबा उर्फ मडके मामा

0
image_editor_output_image-1414548737-1754970106431.jpg

करमाळा, दि. १२ (करमाळा-LIVE)-
माझे वडील उद्धव बाबुराव मडके (आबा) यांचा जन्म ८ एप्रिल १९४७ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबांमध्ये झाला. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांना शिक्षण घेण्यासाठी खुप अडचणी आल्या. आपण स्वावलंबी जीवन जगले पाहिजे व कुटुंबातील लोकांना आधार दिला पाहिजे, हे ठरवून त्यांनी आपले शिक्षण मित्रांच्या पुस्तकावर पूर्ण केले.

शालेय शिक्षण घेत असताना गणवेशाला ही पैसे नसल्याने एका ड्रेसवर त्यांनी शिक्षण पुर्ण केले. आबांचे आई चंद्रभागा व वडील बाबुराव मडके हे हौदावरून लोकांच्या घरी पाणी भरून आपला उदरनिर्वाह करीत असत. अशा परिस्थितीत आबांनी आपले शालेय शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात व महाविद्यालयीन शिक्षण कर्जत येथे पूर्ण केले. त्यानंतर पळसदेव ता.इंदापूर येथील विद्यालयामध्ये त्यांनी शिक्षक म्हणूनही नोकरी केली. त्यानंतर त्यांचा विवाह बाबुराव कुटे या़ंची कन्या शारदा यांच्याशी झाला. त्यांनंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली. आबांचे सासरे बाबूराव कुटे हे एसटी विभागात तिकीट निरीक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एसटी मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते एसटी मध्ये क़्लार्क झाले. पुढे हेड कॅशियरही झाले.

आपल्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी अनेक माणसं जोडली. आम्ही त्यांना आबा म्हणत असलोतरी ते एसटी मध्ये मडकेमामा म्हणून परिचित होते. एसटी विभागांमध्ये कुणाच्याही कामात ते मदत करत आसत. अशा पद्धतीचे काम असल्याने अनेकजण आपले अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. कुणाची आर्थिक समस्या असो, कुणाला मुलाचे शिक्षणाची, मुलीच्या लग्नासाठी घरच्या अडचणीसाठी जर पैसे लागतात मामा सदैव लोकांना मदत करत असत.

त्यांनी जीवनामध्ये पैशाला कधीही महत्त्व दिले नाही मित्र नातेवाईक कर्मचारी या सर्वांना मदत करणे हीच भावना त्यांच्यामध्ये होती. सांसारिक जीवनात त्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पेलली. भाऊ, बहिण, आई-वडील हा परिवार एकसंघ ठेवला, आधार दिला व आपले कर्तव्य पार पाडले. आंबाचा
स्वभाव सरळमार्गी असल्याने त्यांच्या स्वभावाचा लोकांनी गैरफायदा घेतला पण त्यांनी कुणाविषयी तक्रार केली नाही.

एखाद्या संताप्रमाणे सर्वाचा हित जपण्यासाठी आग्रही असणारे आबा मात्र लोकांच्या आनंदात आनंद मानणारे होते. सासंरीक जीवनात आम्ही दोन भाऊ, एक बहिण शोभा आम्हा सर्वांवर छान संस्कार केले. भाऊ गणेश दुध डेअरीत काम करीत असून मी पत्रकार व प्रिंटीग प्रेसचे काम करीत आहे आम्ही दोघेही विवाहित असून अर्चना,सुवर्णा या सुना असुन नातू व नांतवडे असा परिवार आहे. बहिण शोभा हिचा विवाह बुरूडगाव येथील राजेंद्र वसंतराव शिंदे यांच्याशी झाला असून ती सुखी जीवन जगत आहे.

संघर्षमय परिस्थितीतही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आबा यशस्वी झाले. साधी राहणी उच्च विचारसरणी हे त्यांचे धोरण होते. यशस्वी सुखी जीवन जगत असताना अचानक चालता बोलता आबा आम्हाला सोडून देवाघरी गेले. आमचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान गेल्याने, आम्ही पोरके झालो आहे.

आपली आयुष्यात कमतरता भासत राहील तुमच्या सावलीत आम्ही सुखी जीवन जगत होतो पण आता आपली आठवण व आपले विचार आम्हाला जीवनात योग्य दिशा देतील. आपली आठवण येत राहील. प्रेम म्हणजे ह्रदयापासून नजरेत येणारा प्रवास आणि नजरेतून कृपादृष्टी देणारा आशिर्वाद हा आशिर्वाद संपला आपले चरणी विनम्र अभिवादन.!

दिनेश मडके, करमाळा तालुकाध्यक्ष डिजिटल मिडीया पत्रकार संघटना

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page